Suryakumar Yadav : सूर्याची चमक पाहून खुद्द क्रिकेटचा देवही भारावला... किंग कोहली म्हणाला भावा मानलं तुला!

Suryakumar Yadav MI vs GT
Suryakumar Yadav MI vs GT Esakal

Suryakumar Yadav MI vs GT : सूर्यकुमार यादवने गुजरात टायटन्सच्या कसलेल्या गोलंदाजीचा एकट्याने समाचार घेत 49 चेंडूत नाबाद 103 धावा ठोकल्या. सूर्याच्या या शतकी तडाख्यामुळे मुंबईने 20 षटकात 5 बाद 218 धावा केल्या. सूर्याचे हे आयपीएलमधील पहिले वहिले शतक ठरले. त्यातच सूर्यकुमार यादवच्या एका फटक्यावर क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने एक भन्नाट प्रतिक्रिया दिली. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचबरोबर विराट कोहलीने देखील सूर्याच्या शतकानंतर त्वरित प्रतिक्रिया देत भाऊंचं अभिनंदन केलं.

Suryakumar Yadav MI vs GT
MI vs GT Live : सूर्याने ठोकले आयपीएलमधील पहिले शतक, मुंबईने गुजरातसमोर ठेवले 219 धावांचे आव्हान

सूर्यकुमार यादवने 19 वे षटक टाकणाऱ्या मोहम्मद शमीला थर्ड मॅनवरून एक षटकार मारला. हा षटकार पाहिला आणि सचिन तेंडुलकरने एक भन्नार प्रतिक्रिया दिली. असा फटका मारणं दिसताना खूप सोपं दिसतं मात्र ते खूप अवघड असतं. असा फटका फक्त 360 डिग्री सूर्यालाचा मारणे शक्य आहे. सचिनच्या दिलखुलास प्रतिक्रियेने सूर्याचा दिवस सार्थी लागला असणार.

Suryakumar Yadav MI vs GT
Yashasvi Jaiswal : यशस्वी जैसवालने एका दगडात दोन नाही.. तीन नाही... तर मारले तब्बल पाच पक्षी

सूर्यकुमार यादव सामन्याच्या 17 व्या षटकापर्यंत 47 धावांपर्यंत होता. मुंबईची इनिंग संपायला फक्त 3 षटके राहिली असताना त्याचे अर्धशतकही पूर्ण नव्हते. मात्र सूर्या आहे तो. त्याचे आणि 200 प्लस स्ट्राईक रेटचे न तुटणारे नाते आहे. त्याने शेवटच्या 3 षटकात तुफान फटकेबाजी करत 49 चेंडूत नाबाद 103 धावा ठोकल्या.

या शतकी खेळीनंतर लगेचच विराट कोहलीने सूर्याची स्तुती केली. त्याने तुला मानलं भाऊ अशी छोटी मात्र अत्यंत समर्पक अशी प्रतिक्रिया दिली. सूर्याने यंदाच्या हंगामात पहिल्या 5 सामन्यात 47 चेंडू खेळून फक्त 65 धावा केल्या होत्या. यानंतर पुढच्या 7 सामन्यात 204 चेंडूत 413 धावा ठोकल्या आहेत.

Suryakumar Yadav MI vs GT
Virat Kohli Yashasvi Jaiswal : विराटनं यशस्वीचं कौतुक करणारे ट्विट केले त्वरित डिलीट, नेटकरी म्हणतात...

सूर्यकुमार यादवसाठी यंदाच्या हंगाची सुरूवात फारशी खास झाली नाही. मात्र ही सुरूवात त्याच्या चरित्राला सूट होणारी आहे. कारण सूर्या कोणत्याही क्षणी आपली संथ सुरूवात धडाकेबाज खेळीत रूपांतरित करू शकतो. त्याने पहिल्या पाच सामन्यानंतर कसा गिअर बदलला याची साक्ष त्याचे आकडेच देतात. विशेष म्हणजे आयपीएलच्या पहिल्या वहिल्या शतकाची साक्ष द्यायला त्याचे संपूर्ण कुटुंब वानखेडेवर हजर होते.

- 57(26)

- 23(12)

- 55(29)

- 66(31)

- 26(22)

- 83(35)

- 103*(49)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com