संजूच्या 'या' रेकॉर्डवरून नेटकऱ्यांनी केली चेष्टा, पण... |Sanju Samson Trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanju Samson Trolled For Losing 10 Out Of 11 Toss

संजूच्या 'या' रेकॉर्डवरून नेटकऱ्यांनी केली चेष्टा, पण...

मुंबई : आयपीएलच्या 52 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) पंजाब किंग्जशी (Punjab Kings) भिडत आहे. मात्र हा सामना सुरू होण्यापूर्वीच राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) एक रेकॉर्ड केले. मात्र हे रेकॉर्ड फार काही चांगले नाही. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चेष्टा (Trolled) सुरू झाली. काही नेटकरी चेष्टा करत असले तरी काहींनी अशा बिकट परिस्थिती देखील संजू सॅमसनने आपल्या संघाला सध्यातरी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहचवण्यात यश मिळवले याची स्तुती केली.

हेही वाचा: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचा प्रवास आता युट्यूबवर

संजू सॅमसनचे यंदाच्या आयपीएल हंगामातील टॉसच्या (Toss) बाबतीतले रेकॉर्ड पाहिले तर त्याच्या इतका कमनशिबी कर्णधार कोणताच असू शकत नाही असे वाटते. सध्या सोशल मिडियावर संजूच्या या कमनशिबीपणावर खूप ट्रोलिंग होत आहे. संजू सॅमसन आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 11 व्यांदा नाणेफेकीसाठी मैदानात उतरला. मात्र त्याला आजच्या सामन्यात देखील नाणेफेक जिंकता आली नाही. विशेष म्हणजे संजूने 11 पैकी फक्त एकदाच नाणेफेक जिंकली आहे. तर 10 सामन्यात टॉस गमावला आहे. पंजाबविरूद्धच्या सामन्यात टॉस हारून त्याने टॉस हरण्याचा षटकार मारला.

सोशल मीडियावर संजूच्या या सततच्या टॉस हरणाऱ्याने वैतागलेल्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरूवात केली. एका नेटकऱ्याने संजू कितीवेळा नाणेफेक हरला त्याचा उल्लेख केला.

तर दुसऱ्या नेटकऱ्याने नाणेफेकीसाठी आता दोन्ही बाजू एकच असलेले नाणे देण्याची गरज आहे असे म्हणत संजूची खेचली.

अजून एका नेटकऱ्याने नाणेफेकीला मयांक अग्रवाल आणि संजू सॅमसन गेले असताना नाणेफेक केन विल्यमसनने जिंकली तर आश्चर्य वाटायला नको असा उपरोधिक टोला लगावला. केन विल्यमसन नाणेफेक जिंकण्याबाबत खूप लकी आहे.

मात्र एका नेटकऱ्याने जरी संजू 11 पैकी 10 नाणेफेक हरला असला तरी त्याने आपल्या संघाला 12 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानापर्यंत पोहचवले आहे. त्याच्या नेतृत्वाला दाद दिली पाहिजे असे म्हणत संजूचे कौतुक केले.

Web Title: Sanju Samson Trolled For Losing 10 Out Of 11 Toss In Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top