आयपीएलमध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. यावेळी दिल्लीने एक गडी राखत लखनऊवर विजय मिळवला. अगदी शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलेल्या या सामन्यात आशुतोष शर्मा आणि विप्राज निगम यांनी जोरदार फटकेबाजी करत दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, विप्राज आणि आशुतोष यांच्या फटकेबाजीवर आता फाफ डुप्लेसीने एक मजेशीर टीप्पणी केली आहे.