Gautam Gambhir : केकेआरमध्ये थांबण्यासाठी शाहरूखने गंभीरसमोर ठेवला होता ब्लँक चेक

Gautam Gambhir : अनेकांकडून नकार ऐकलेली बीसीसीआय आता मुख्य प्रशिक्षक पद स्विकारावे यासाठी गौतम गंभीरच्या मागे हात धुवून लागली आहे.
Gautam Gambhir
Shah Rukh Khan Offered blank cheque To Gautam Gambhir esakal

Gautam Gambhir Team India Head Coach : भारतीय क्रिकेट बोर्ड पुरूष संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी जोर लावत आहे. गौतम गंभीर हा बीसीसीआयच्या रडारवर असून केकेआरच्या मेंटॉरनं भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्विकारावी यासाठी बीसीसीआय जोरदार प्रयत्न करत आहेत.

बीसीसीआयने अनेक विदेशी प्रशिक्षकांना टांग दिली आहे. त्यामुळे राहुल द्रविडचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी बीसीसीआयकडे चांगले पर्याय फार कमी उरले आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सध्या केकेआरचा मेंटॉर असलेल्या गौतम गंभीरला केकेआरचा सहमालक शाहरूख खानने केकेआरमध्ये पुढची 10 वर्षे थांबण्यासाठी ब्लँक चेक दिल्याचे बोलले जात आहे. हा ऑफर गौतम गंभीर लखनौ सुपर जायंट्समध्ये असताना दिली गेली होती.

Gautam Gambhir
IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार गौतम गंभीर हा देखील भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी उत्सुक आहे. मात्र त्याने बीसीसीआयसमोर एक माफक अट ठेवली आहे. त्याने ज्यावेळी गौतम गंभीर पदासाठी अर्ज भरेल त्यानंतर त्याच्या निवडीची 100 टक्के शाश्वती असली पाहिजे अशी अट ठेवली आहे.

जर बीसीसीआय बीसीसीआयसाठी गौजम गंभीर हा अनेक उमेदवारांमधील एक उमेदवार असेल तर गौतम गंभीर पदासाठी अर्जच करणार नाहीये.

बीसीसीआयने गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्विकारावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. केकेआरचा मालक शाहरूख खान हा देखील गौतम गंभीरला फ्रेंचायजीमध्ये दीर्घ काळासाठी ठेवण्यास उत्सुक आहे. शाहरूखने सांगितले की त्याने गौतम गंभीरला पुढचे 10 वर्षे फ्रेंचायजीसोबत राहण्यासाठी ब्लँक चेक दिला आहे.

Gautam Gambhir
KKR vs SRH Final LIVE Score : आयपीएलचा किंग कोण? 'गंभीर'च्या कोलकातासमोर हैदराबादचे कडवे आव्हान

बीसीसीआयला भारतीय मुख्य प्रशिक्षक निवडताना अनेकांचा नकार ऐकावा लागला आहे. रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर आणि स्टिफन फ्लेमिंग यांनी राहुल द्रविडचा उत्तराधिकारी होण्यास नकार दिला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मात्र हे वृत्त खोडून काढले आहे. त्यांनी सांगितले की कोणत्याही ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडे प्रस्ताव पाठवला नव्हता.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com