IPL 2024 Delhi Capitals : गोलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी ; दिल्ली संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांचा त्रागा

कोलकता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात आमच्या गोलंदाजांची कामगिरी अतिशय लाजिरवाणी होती.
IPL 2024 Delhi Capitals
IPL 2024 Delhi Capitals sakal

विशाखापट्टण : कोलकता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात आमच्या गोलंदाजांची कामगिरी अतिशय लाजिरवाणी होती. गोलंदाज धावांची लयलूट करू देत होते. त्यात २० षटकांसाठी दोन तास घेऊन पाय आणखी खोलात टाकला, अशी कडक टीका दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी केली.

कोणतेही नियोजन नसलेला स्वैर मारा दिल्लीच्या गोलंदाजांनी केला. याचा फायदा कोलकताच्या फलंदाजांनी घेत २० षटकांत २७२ धावा उभारल्या. २० षटकांसाठी दोन तास घेतले. अनेक चुकीच्या गोष्टी आमच्या संघाकडून घडत होत्या. हे कदापी सहन करण्यासारखे नाही.

त्यावर लवकरात लवकर उपाय करून पुढे जायला हवे, असे सांगून पाँटिंग म्हणाले, कोलकता सलामीवीरांनी पहिल्या सहा षटकांत ८८ धावांचा खच पाडला. यातून त्याच वेळी मार्ग काढायला हवा होता. कर्णधार रिषभ पंतचेही नेतृत्व कमकुवत ठरत होते.

IPL 2024 Delhi Capitals
IPL 2024 GT vs PBKS : शशांक सिंगचे झुंजार अर्धशतक, पंजाबने गुजरातचा विजयी घास हिरावला

पंतला पुन्हा दंड

षटकांची गती न राखल्यामुळे पंतला सलग दुसऱ्या सामन्यात दंड करण्यात आला. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यामुळे यावेळी त्याला २४ लाखांचा दंड करण्यात आला. तसेच इम्पॅक्ट खेळाडूंसह सामन्यात खेळलेल्या सर्व खेळाडूंना ६ लाख किंवा सामना मानधनातील २५ टक्के, यातील कमी असलेल्या रकमेचा दंड करण्यात आला. दिल्लीचा पुढील सामना मुंबईविरुद्ध येत्या रविवारी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com