GT vs PBKS : अखेर पंजाबनेच गुजरातला पाणी पाजले

Shikhar Dhawan half Century Punjab Kings Defeat Gujarat Titans
Shikhar Dhawan half Century Punjab Kings Defeat Gujarat TitansESAKAL

मुंबई : अखेर गुजरातची सलग पाच विजयांची मालिका पंजाबने खंडीत केली. पंजाबने गुजरात टायटन्सचे 144 धावांचे आव्हान 16 षटकात 2 फलंदाजांच्या मोबदल्यातच पार केले. पंजाब किंग्जकडून सलामीवीर शिखर धवनने 62 धावांनी दमदार खेळी केली. तर लिम लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूत 30 धावांची खेळी करत सामना लवकर संपवला. पंजाबकडून गोलंदाजीत कसिगो रबाडाने दमदार कामगिरी करत 4 विकेट घेतल्या. तर गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 65 धावांची झुंजार खेळी केली. (Shikhar Dhawan half Century Punjab Kings Defeat Gujarat Titans IPL 2022)

Shikhar Dhawan half Century Punjab Kings Defeat Gujarat Titans
Video : शुभमन झाला धावबाद भडकला मात्र गोलंदाजावर!

गुजरातने ठेवलेल्या 144 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेला जॉनी बेअरस्टो 1 धावेवर बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने बाद केले. मात्र त्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि भानुका राजपक्षेने दमदार फलंदाजी करण्यास सुरूवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली.

दरम्यान, शिखर धवनने आपले अर्धशतकही पूर्ण केले. मात्र लॉकी फर्ग्युसनने राजपक्षेला 40 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या लिव्हिंस्टोनने षटकार आणि चौकारांची बरसात करत झपाट्याने धावा करण्यास सुरूवात केली. त्याने 10 चेंडूत 32 धावा ठोकत सामना 16 व्या षटकातच जिंकून दिला.

Shikhar Dhawan half Century Punjab Kings Defeat Gujarat Titans
मॅच विनिंग इनिंग खेळण्यापूर्वी रिंकूने हातावर काय गोंदवले?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजराची सुरुवात खराब झाली. गुजरातचे दोन्ही सलामीवीर 34 धावांवर माघारी गेले. शुभमन गिल 9 धावांवर धावबाद झाला. तर 21 धावा करणाऱ्या वृद्धीमान साहाला रबाडाने बाद केले. दरम्यान, कर्णधार हार्दिक पांड्या डाव सावरण्यासाठी मैदानावर आला. मात्र त्याला ऋषी धवनने अवघ्या 1 धावेवर बाद करत गुजरातला मोठा धक्का दिला.

यानंतर आलेल्या डेव्हिड मिलर आणि साई सुदर्शन यांनी भागीदारी रचत डाव सावण्याचा प्रयत्न केला. मात्र लिव्हिंगस्टोनने मिलरला 11 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. ठराविक अंतराने विकेट पडत असल्याने गुजरातची धावगती मंदावली. दरम्यान, रबाडाने पुन्हा एकदा गुजरातला धक्के देण्यास सुरूवात केली. कसिगो रबाडाने 17 व्या षटकात राहुल तेवतिया (11) आणि राशिद खानला (0) बाद करत पाठोपाठ दोन धक्के दिले.

त्यानंतर प्रदीप सांगवान 2 तर लोकी फर्ग्युसन 5 धावांची भर घालून माघारी परतला. दरम्यान, एका बाजूने झुंजार फलंदाजी करणाऱ्या साई सुदर्शनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 50 चेंडूत केलेल्या 65 धावांच्या जोरावर गुजरातने 20 षटकात 8 बाद 143 धावा केल्या. पंजाबकडून कसिगो रबाडाने 33 धावात 4 विकेट घेतल्या. तर धवन, अर्शदीप, लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com