
Video : शुभमन झाला धावबाद भडकला मात्र गोलंदाजावर!
मुंबई : आयपीएलच्या 48 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गुजरातची सुरूवात काही चांगली झाली नाही. गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) तिसऱ्या षटकात धावबाद (Run Out) झाला.
हेही वाचा: शास्त्रींचे बिर्याणी ट्विट व्हायरल; शमी - सिराजल्या ईदच्या दिल्या हटके शुभेच्छा
संदीप शर्मा (Sandeep Sharma) सामन्याचे तिसरे षटक टाकत होता. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलने एक कव्हर ड्राईव्ह माराला. तेथे शुभमन गिल एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ऋषी धवनने (Rishi Dhawan) गिलचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्याने नॉन स्ट्राईकरला पोहचण्याचा प्रयत्न करणाऱ्या शुभमन गिलला थेट फेकीद्वारे धावबाद केले. मात्र गिल 9 धावांवर धावबाद झाल्यानंतर गोलंदाज संदीप शर्मावर जाम भडकला.
संदीप शर्माने ज्यावेळी तो चेंडू टाकला त्यावेळी तो फॉलो थ्रोमध्ये पुढे जात होता. तो पुढे जाऊन थांबला आणि ऋषी धवनकडे पाहू लागला. दरम्यान, शुभमन गिल धाव घेण्यासाठी धावत होता. त्याच्या बरोबर मधी गोलंदाज संदीप शर्मा आपला फॉलो थ्रो पूर्ण करत होता. त्यामुळे गिलला आपला रस्ता बदलावा लागला. यातच तो धावबाद झाला. त्यानंतर गिल संदीप शर्मावर भडकला. विशेष म्हणजे संदीप शर्मा आणि शुभमन गिल हे दोघेही रणजी ट्रॉफीमध्ये पंजाब कडून खेळतात. त्यामुळे संदीपने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की मी फक्त माझा फॉलो थ्रो पूर्ण करत होतो. आणि मी माझ्या जाग्यावरून हललो नाही.
हेही वाचा: मॅच विनिंग इनिंग खेळण्यापूर्वी रिंकूने हातावर काय गोंदवले?
शुभमन गिलने यंदाच्या आयपीएल हंगामात फारशा काही धावा केलेल्या नाहीत. त्याने 10 सामन्यात 29.9 च्या सरासरीने फक्त 269 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने दोन डावात 81 आणि 96 अशा धावा केल्या होत्या. बाकीच्या 8 डावात त्याने फक्त 100 धावा केल्या. गुजरातने लिलावापूर्वी शुभमन गिलला ड्राफ्ट केले होते. तो गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. मात्र केकेआरने त्याला रिटेन केले नाही.
Web Title: Shubman Gill Angry With Bowler Sandeep Sharma After Run Out
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..