'छोटी बच्ची हो क्या'; शिखर धवन - प्रिती झिंटाचा जीममधील VIDEO व्हायरल | Shikhar Dhawan Punjab Kings Co Owner Preity Zinta | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'छोटी बच्ची हो क्या'; शिखर धवन - प्रिती झिंटाचा जीममधील VIDEO व्हायरल

'छोटी बच्ची हो क्या'; शिखर धवन - प्रिती झिंटाचा जीममधील VIDEO व्हायरल

IPL 2022 : पंजाब किंग्जचा (Punjab Kings) धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) यंदाच्या हंगामात पंजाबला दमदार सुरूवात करून दिली आहे. त्याने अनेक महत्वपूर्ण खेळी करत पंजाबच्या विजयात मोठा वाटा उचलला आहे. दरम्यान, शिखर धवनने हा आपल्या चांगला फॉर्म मैदानाबरोबरच जीममध्येही दाखवत आहे. सध्या शिखर धवन आणि पंजाबच्या मालकीणबाई प्रिती झिंटा (Punjab Kings Co Owner Preity Zinta) एकत्र जीममध्ये घाम गाळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा: राहुल द्रविड भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती लावण्याबाबत म्हणतो...

विशेष म्हणजे शिखर धवनने प्रिती झिंटाबरोबरचा जीममधला व्हिडिओ शेअर करून त्याच्या बॅकग्राऊंडला टायगर श्रॉफचे 'छोटी बच्ची हो क्या' (Chhoti Bacchi Ho Kya) हा डायलॉग लावला. या व्हिडिओला 'प्रिती झिंटाबरोबर जीममध्ये घालवलेला एक मजेदार क्षण' असे कॅप्शन दिले. या व्हिडिओवर प्रिती झिंटाने देखील कमेंट केली. प्रिती कमेंटमध्ये म्हणते, 'आता मला कळाले की तुम्ही जर धवनसोबत जीममध्ये भेटता त्यावेळी काय होते. तो वर्कआऊटच्यावेळी हा व्हायरल डायलॉग म्हणत असतो.'

हेही वाचा: GT vs LSG : राशिद खानसाठी आजचा सामना ठरू शकतो खास

शिखर धवन सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियावरील त्याच्या रील्सद्वारे त्याच्या विनोदी वृत्तीचे दर्शन त्याच्या चाहत्यांना कायम घडत असते. सध्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात पंजाब किंग्ज ही 8 स्थानावर आहे. त्यांना प्ले ऑफच्या (Play Off) शर्यतीत आपले आव्हान कायम राखायचे असेल तर त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

Web Title: Shikhar Dhawan Punjab Kings Co Owner Preity Zinta Gym Video Gone Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top