Shimron Hetmyer Leaving IPL Midway | हेटमायरच्या घरी 'गुडन्यूज'; IPL मधेच सोडून मायदेशी परतला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shimron Hetmyer Returned Country After Leaving IPL Midway Rajasthan Royals

हेटमायरच्या घरी 'गुडन्यूज'; IPL मधेच सोडून मायदेशी परतला!

Shimron Hetmyer RR IPL 2022: राजस्थान रॉयल्सचा दिग्गज शिमरॉन हेटमायर त्याच्या देशात परतला आहे. राजस्थानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याची माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये हेटमायर चाहत्यांना संदेश देताना दिसत आहे. शिमरॉन हेटमायरने व्हिडिओमध्ये खुलासा केला आहे की तो आयपीएल मध्येच सोडून आपल्या देशात का परतत आहे. खरंतर हेटमायर आता वडील होणार आहे. त्यामुळेच पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर तो त्याच्या देशात परतला आहे. मुलाच्या जन्मानंतर हेटमायर पुन्हा परत येईल असे त्यांनी सांगितले.(Shimron Hetmyer Returned Country After Leaving IPL Midway Rajasthan Royals)

हेही वाचा: भरवश्याच्या म्हशीला...; ७ कोटींच्या शिवम मावीचा IPL मधला लाजिरवाणा रेकॉर्ड!

पंजाब किंग्सविरुद्धच्या कालच्या सामन्यात शिमरॉन हेटमायरने 16 चेंडूत 31 धावा केल्या. त्यात त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. या हंगामात हेटमायर चांगली कामगिरी करत आहे. हेटमायरने या हंगामात एक खास विक्रम केला आहे. आयपीएल-15 मध्‍ये हेटमायरने डेथ ओव्‍हरमध्‍ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्यांनी डेथ ओव्‍हरमध्‍ये 209 धावा काढून राजस्‍थानसाठी फिनिशरची भूमिका चोख बजावताना दिसला आहे.

हेही वाचा: अपमान झाला तरी 'मी पुन्हा येईन'; ख्रिस गेलची घोषणा, 'या' संघातर्फे खेळणार

दिनेश कार्तिक या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या हंगामात कार्तिकची बॅट डेथ ओव्हर्समध्ये धावा करत आहे. आरसीबीकडून डेथ ओव्हर्समध्ये कार्तिकने फलंदाजी करताना 174 धावा केल्या आहेत. त्याचवेळी राहुल तेवतिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत डेथ ओव्हरमध्ये एकूण 134 धावा केल्या आहेत.

Web Title: Shimron Hetmyer Returned Country After Leaving Ipl Midway Rajasthan Royals Back Soon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top