Shimron Hetmyer : संजूने डाव सावरला तर हेटमायरच्या हिटिंगने पांड्याचे 'टॉपर' स्वप्न भंगले

Shimron Hetmyer GT vs RR
Shimron Hetmyer GT vs RR Esakal

Shimron Hetmyer GT vs RR : आयपीएलच्या 23 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा ताणून धरलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 3 विकेट्सनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 177 धावांपर्यंत मजल मारली होती. हे आव्हान राजस्थानने 19.2 षटकात 7 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.

या विजयात शिमरॉन हेटमायरने 26 चेंडूत नाबाद 56 धावा करत मोलाचे योगदान दिले. तर कर्णधार संजू सॅमसनने 32 चेंडूत 60 धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमीने 3 तर राशिद खानने 2 विकेट घेत राजस्थानचा चेस अवघड केला.

Shimron Hetmyer GT vs RR
GT vs RR Video : झेल पकडण्यांच श्रेय घेण्यासाठी धावले तिघे अन् चौथ्यानंच डाव साधला

गुजरातचे 178 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उरतलेल्या राजस्थानची हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमीने अवस्था 2 बाद 4 धावा अशी केली होती. या धक्कादायक सुरूवातीतून राजस्थानला देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन यांनी बाहेर काढले. या दोघांनी नव्या षटकात राजस्थानला 47 धावांपर्यंत पोहचवले.

मात्र यानंतर पडिक्कल 26 धावा करून तर रियान पराग 5 धावा करून बाद झाले. फिरकीपटू राशिद खानने राजस्थानची अवस्था 4 बाद 55 धावा अशी केली. या परिस्थितीतून राजस्थान हा सामना जिंकेल असे वाटत नव्हते.

Shimron Hetmyer GT vs RR
GT vs RR : गिल - मिलरच्या अर्धशतकाच्या आड आला संदीप शर्मा! गुजरातचे 200 चे स्वप्नही भंगले

मात्र कर्णधार संजू सॅमसन आणि शिमरोन हेटमायरने पुढच्या 4 षटकात 59 धावांची भागीदारी रचत सामना जिवंत ठेवला. मात्र ही जोडी नूर अहमदने फोडली. त्याने 60 धावांवर संजूला बाद केले. यानंतर हेटमायरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने आक्रमक फटकेबाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. या दरम्यान, ध्रुव जुरेलने 18 तर आर. अश्विनने 10 धावांची छोटी मात्र अत्यंत महत्वाची खेळी केली.

मात्र या दोघांची शिकार मोहम्मद शमीने केली. दरम्यान, शिमरॉन हेटमायरने सामना शेवटच्या षटकात 7 धावा असा आणला. त्याने नूर अहमदच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर षटकार मारत सामना संपवला.

(Sports Latest News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com