
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने बुधवारी (२१ मे) दिल्ली कॅपिटल्स संघाला ५९ धावांनी पराभूत केले. वानखेडे स्टेडियमवर हा सामना झाला होता. या सामन्यात विजय मिळवत मुंबईने प्लेऑफमध्येही स्थान मिळवले आहे. मुंबई प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा चौथा संघ ठरला आहे.