Prithvi Shaw RR vs DC : दिल्ली पृथ्वी शॉला सातत्यानं का बेंचवर बसवत आहे? गांगुली म्हणतो आम्ही ठरवलं की...

Prithvi Shaw RR vs DC Sourav Ganguly : पृथ्वी शॉला दिल्ली कॅपिटल्सने लिलावात रिटेन केलं मात्र हंगामात बेंचवर बसवलंय
Prithvi Shaw RR vs DC IPL 2024
Prithvi Shaw RR vs DC IPL 2024 esakal

Prithvi Shaw RR vs DC IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात आपल्या संघात दोन बदल केले. मात्र या दोन्ही बदलात पृथ्वी शॉला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दिल्लीने पृथ्वी शॉला आयपीएल लिलावात रिटेंन केलं होतं. मात्र हंगाम सुरू झाल्यावर मात्र त्यांनी त्याला पहिल्या दोन सामन्यात बेंचवर ठेवल्याने सर्वांनी भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे त्याचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून देखील वापर करण्यात आलेला नाही.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा पृथ्वी शॉला बेंचवर बसवण्यात आल्यावर दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेट संचालक सौरव गांगुलीला पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी त्याने पृथ्वी शॉला न खेळवण्याचं कारण सांगितलं.

Prithvi Shaw RR vs DC IPL 2024
RCB vs KKR Playing 11IPL 2024 : आरसीबीच्या होम ग्राऊंड खेळताना केकेआर बदलणार का आपली रणनिती अन् प्लेईंग 11

सौरव गांगुली म्हणाला की, 'पृथ्वी शॉ हा सलामीवीर आहे. आम्ही मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर या सलामीवीरांसोबत मैदानात उतरायचं ठरवलं आहे. रिकी भुई हा मधल्या फळीतील फलंदाज आहे. त्यामुळे त्या दोघांची प्लेस वेगवेगळी आहे. आम्ही वेगळ्या सलामीवीरांसह खेळत आहोत. ते दोघे ऑस्ट्रेलियाकडून सलामीला खेळतात. आम्ही देखील त्यांच्यासोबतच जाण्याचा निर्णय घेतला.

वॉर्नर आणि मार्शने पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात चांगली सुरूवात करून दिली होती. त्यामुळेच दिल्लीने 174 धावांचे टार्गेट ठेवले होते. चांगल्या सुरूवातीनंतर दिल्लीला आपली धावगती चांगली ठेवण्यात अपयश आलं होतं.

Prithvi Shaw RR vs DC IPL 2024
IPL 2024 Mistry Girl : रोहित, हार्दिकसोबत फोटो व्हायरल... कोण आहे मिस्ट्री गर्ल सेजल जैस्वाल?

गांगुलीने पृथ्वी शॉ हा हंगामापूर्वीच्या सरावावेळी देखील फार कमी उपस्थित होता याकडे लक्ष वेधले. गांगुली म्हणाला की, 'पृथ्वी शॉचा प्रवास पाहता. त्याला खूप सेटबॅक बसले आहेत. त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तो रणजी ट्रॉफी खेळण्यामध्ये गुंतला होता. असं असलं तरी पृथ्वी शॉची गुणवत्ता पाहून त्याला दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलं आहे.

(IPL Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com