वादातून सुटका होण्यासाठी दादानं घेतला मोठा निर्णय

आयपीएल स्पर्धेतील नव्या संघाशी सौरव गांगुली यांचे कनेक्शन असल्याचे समोर आले होते.
Sourav Ganguly
Sourav Gangulysakal
Summary

आयपीएल स्पर्धेतील नव्या संघाशी सौरव गांगुली यांचे कनेक्शन असल्याचे समोर आले होते.

Sourav Ganguly Step Down ATK Mohun Bagan Director : क्रिकेटच्या मैदानातील दादा आणि भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान असलेले सौरव गांगुली वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. आयपीएलमध्ये दोन नव्या संघांची एन्ट्री झाल्यानंतर लाभाच्या दुहेरी हितसंबंधाच्या प्रकरणात दादाची कोंडीत अडकण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ समाविष्ट झाले आहेत. यातील लखनऊच्या संघाचे अधिकार हे गोएंका ग्रुपच्या आरपीएसजी (RPSG) ने विक्रमी किंमत मोजून विकत घेतले.

Sourav Ganguly
धमाकेदार ट्रेलरनंतर इंग्लंडसाठी सुरु होणार खरी कसोटी

आयपीएल स्पर्धेतील नव्या संघाशी सौरव गांगुली यांचे कनेक्शन असल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले होते. सौरव गांगुली एटीके मोहन बागान फुटबॉल संघाच्या संचालकपदी कार्यरत आहेत. एटीके मोहन बागान आरपीएसजी (RPSG) च्या मालकीचे आहे. त्यामुळे दुहेरी हितसंबंधामुळे गांगुलींसमोर अडचणी उभ्या राहणार असल्याच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. हे प्रकरण वाढण्यापूर्वी गांगुली यांनी देशातील लोकप्रिय फुटबॉल क्लबपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, सौरव गांगुली यांनी मोहन बागानमधील पदापासून दूर होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Sourav Ganguly
Video : अदिल राशीदचा भन्नाट झेल एकदा पाहाच

आयपीएलच्या आगामी हंगामात दोन नव्या संघासह 10 संघ मैदानात उतरणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नव्या संघाच्या समावेशामुळे बीसीसीआयला मोठा फायदा झाला आहे. आरपीएसजी ग्रुप कोलकाताचे उद्योगपती संजीव गोएंका यांनी लखनऊ संघ खरेदी करण्यासाठी तब्बल 7,090 कोटी रुपये मोजले आहेत. दुसरीकडे सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद संघासाठी 5,625 कोटी रुपयांचे डील केले आहे.

याआधीही गांगुलींसदर्भात रंगला होता दुहेरी हितसंबंधाचा वाद

हितसंबंधांचा मुद्दा हा न्या. राजेंद्र लोढा समितीने केलेल्या शिफारशीचा एक भाग आहे. एकाचवेळी एखादी व्यक्ती दोन पदावर कार्यरत राहू शकत नाही. बीसीसीआयच्या अध्यक्षस्थानी असताना दिल्ली कॅपिटल्समध्ये सल्लागार म्हणून काम पाहण्यासंदर्भात गांगुलींच्यावर दुहेरी हितसंबंधाचे आरोप झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com