South Africa : टी-20 वर्ल्ड कपपूर्वी दक्षिण आफ्रिका संघ पेटला वादात! फक्त एकच कृष्णवर्णीय खेळाडूला संधी, बोर्डावर होतेय टीका

येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत १५ खेळाडूंच्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात कागिसो रबाडाच्या रूपाने केवळ एकच कृष्णवर्णीय आफ्रिकन खेळाडूची निवड केल्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
South Africa slammed for naming only one black player in T20 World Cup squad 2024
South Africa slammed for naming only one black player in T20 World Cup squad 2024sakal

South Africa T20 World Cup squad 2024 : येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत १५ खेळाडूंच्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात कागिसो रबाडाच्या रूपाने केवळ एकच कृष्णवर्णीय आफ्रिकन खेळाडूची निवड केल्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

मैदानावर खेळणाऱ्या अंतिम ११ खेळाडूंच्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात किमान सहा खेळाडू इतर वर्णीय आणि त्यातील दोन कृष्णवर्णीय आफ्रिकन खेळाडू असण्याचा अलिखित नियम आहे; परंतु येत्या १ तारखेपासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या १५ खेळाडूंच्या संघात रबाडा हाच केवळ कृष्णवर्णीय आफ्रिकन खेळाडू आहे.

तर इतर वर्णीय खेळाडूंमध्ये (श्वेत वर्णी खेळाडूंचा अपवाद वगळता) रेझा हेन्रिक्स, बियॉन फोर्ट्युन, केशव महाराज, ताब्रेझ शम्सी आणि ऑटिनेल बार्टमन यांचा समावेश आहे.

South Africa slammed for naming only one black player in T20 World Cup squad 2024
IPL 2024 RR vs PBKS: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

आफ्रिकन सरकारच्या धोरणानुसार क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेसाठी ही निवड करण्यात आली नसल्यामुळे आफ्रिकेचे माजी क्रीडा मंत्री फिकिल एम्बालुला यांनी टीका केली आहे. केवळ एकच कृष्णवर्णीय आफ्रिकन खेळाडूची निवड करणे हे धोरणाच्या विरोधात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आफ्रिकेत क्रिकेटची पिछेहाट होत आहे, अशी टीका दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष रे माली यांनीही केली आहे. आफ्रिका क्रिकेटने चांगली प्रगती केली होती; परंतु त्याहून पुढे जायच्याऐवजी एक पाऊल मागे गेले आहे, असे माली म्हणतात.

South Africa slammed for naming only one black player in T20 World Cup squad 2024
MS Dhoni: 'चाहत्यांसाठी आधी धोनी अन् मग CSK, जडेजाही वैतागतो', चेन्नईच्याच माजी खेळाडूचा मोठा खुलासा

आफ्रिका संघ अधिक कृष्णवर्णीय खेळाडू का नाहीत, हे समर्थनीय नाही. या देशासाठी एकता राखा, असे सांगणाऱ्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. खेळाडूंना त्यांच्या सुरुवातीपासून मार्गदर्शन केले जाते आणि त्यांच्या प्रगतीचेही निरीक्षण करून त्यांना पुढे संधी दिली जाते, त्यामुळे किती खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतील, याची माहिती मंडळाला असायला हवी, असेही मत माली यांनी मांडले.

कोण करतो संघ निवड?

सध्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळात निवड समिती अस्तित्वात नाही, त्यामुळे शुक्री कॉनर्ड (कसोटी) आणि रॉब वॉल्टर (व्हाईटबॉल) हे मुख्य प्रशिक्षकच संघ निवडतात.

प्रशिक्षकांकडून समर्थन

मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या १५ खेळाडूंच्या संघाचे समर्थन केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतर वर्णीय खेळाडूंची हवी तेवढी उच्च श्रेणीची गुणवत्ता नाही. त्यासाठी योग्य रचना तयार करायला हवी, त्यामुळे सहा महिने, वर्ष किंवा पुढच्या दोन वर्षांत मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत असे खेळाडू तयार होतील, असे वॉल्टर यांनी सांगितले.

लुंगी एन्गिडी या आणखी एका कृष्णवर्णीय खेळाडूची निवड करण्यात आली आहे; परंतु तो राखीव खेळाडू असल्याने त्याला विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com