Suresh Raina comments on Ayush Mhatre before CSK vs MI : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील एक क्लासिकोचा परतीचा सामना उद्या वानखेडे स्टेडियमवर होतोय. चेन्नईने पहिल्या लढतीत मुंबईला चेपॉकवर पराभूत केले होते, परंतु त्यानंतर त्यांच्या कामगिरीचा आलेख हा उतरता राहिला आहे. तेच मुंबईची गाडी हळुहळू रुळावर येत आहे. अशा परिस्थितीत वानखेडे स्टेडियमवर मुंबईचे पारडे जड मानले जात आहे. चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू व JioStar Expert पॅनलचा सदस्य सुरेश रैना ( Suresh Raina) यानेही हेच मत व्यक्त केले आहे. 'सकाळ डिजिटल' टीमने MI vs CSK लढतीपूर्वी रैनासोबत गप्पा मारल्या.