
मुंबई : भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ते नाव म्हणजे सनराईजर्स हैदराबादचा वेगावान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik). उमरान मलिकने आयपीएलमध्ये सातत्याने 150 किमी प्रति तास पेक्षा जास्त वेगाने मारा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देशातीलच नाही तर विदेशातील खेळाडू देखील उमरान मलिकची स्तुती करताना थकत नाहीयेत. मात्र उमरान मलिकला शेजारील पाकिस्तानमधून जोरदार आव्हान मिळत आहे. हारिस रौफच्या (Haris Rauf) वेगाची क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
गुजरात टायटन्स विरूद्ध उमारन मलिकने 153.3 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकला. हा त्याचा आयपीएल हंगामातील सर्वात वेगवान चेंडू होता. तर पाकिस्तानच्या 28 वर्षाच्या हारिस रौफने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये 154.70 किमी प्रती तास वेगाने गोलंदाजी केली होती. त्यामुळे आता क्रिकेट जगतात पुढचा स्पीड स्टार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये पाकिस्तानचा हारिस रौफ आणि भारताचा उमरान मलिक यांच्यात जोरदार टक्कर होणार हे नक्की.
जागतिक स्तरावर सर्वात वेगवान गोलंदाज (World Fastest Bowler) कोण यासाठी 90 च्या दशकात प्रामुख्याने तीन गोलंदाजांच्यात स्पर्धा लागलेली असायची. यात पाकिस्तानचा शोएब अख्तर, ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली, शॉन टेट आणि न्यूझीलंडचा शेन बाँड यांचात ही स्पर्धा होती.
सर्वात वेगावान चेंडू टाकण्याचे रेकॉर्ड (World Fastest Ball)
शोएब अख्तर - 2003 - इंग्लंड - 161.3 किमी प्रती तास
ब्रेट ली - 2005 - न्यूझीलंड - 161.1 किमी प्रती तास
शॉन टेट - 2011- इंग्लंड - 161.1 किमी प्रती तास
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.