Daniel Vettori on SRH teams aggressive cricket strategy : पहिल्या सामन्यात सनराइजर्स हैदराबादने (SRH) राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना 286 धावांचा डोंगर उभारला होता. गेल्या हंगामातही हैदराबादच्या संघाने 280 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या हंगामात SRH हा संघ 300 धावांचा टप्पा पार करेल, असे बोलले जाऊ लागले होते. मात्र, गेल्या दोन सामन्यांत हैदराबादला 200 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. त्यामुळे हैदराबादच्या संघाला आक्रमक खेळण्याचा फटका बसतोय का, अशी चर्चा सुरू झाली आहे.