
भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCI) सध्या बऱ्याच हालचाली सुरू आहेत. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील ३ सदस्यांच्या हकालपट्टीचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यात आता लवकरच भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या वार्षिक कराराची घोषणा करण्यात येणार आहे. काही अपवाद वगळता, या यादीत फारसे आश्चर्यकारक बदल होण्याची शक्यता नाही. पण, बीसीसीआय काही आश्वासक खेळाडूंना, जे पूर्णपणे पात्रता निकष पूर्ण करत नाहीत, त्यांचा या करारात समावेश करणअयाची शक्यता आहे.