
सनरायझर्स हैदराबाद संघाने इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. रविवारी अखेरच्या सामन्यात हैदराबादने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सचा ११० धावांनी पराभव केला. हा सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचाही हा शेवटचा सामना होता.
या दोन्ही संघांचे आव्हान यापूर्वीच संपले होते. त्यामुळे हा दोन्ही संघांचा यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना होता. कोलकातासाठी मात्र शेवट निराशाजनक राहिला. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ गेल्यावर्षीचे अंतिम सामन्यात भिडलेले संघ होते, पण यंदा त्यांना प्लेऑफ गाठता आली नाही.