SRH vs RR Qualifier 2 : क्वालिफायर-2 सामना पावसामुळे रद्द झाला तर... कोणता संघ फायनलमध्ये मारणार एंन्ट्री?

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला.
Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad
Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने 4 गडी राखून शानदार विजय नोंदवला. अशा प्रकारे रॉयल्सने क्वालिफायर 2 मध्ये स्थान मिळवले आहे. आता त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. या दोन संघांमधला दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवार 24 मे रोजी चेन्नईत खेळला जाईल. पण या दोन संघांमधील हा सामना रद्द झाला तर कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल?

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad
Hardik Pandya Natasa Stankovic : नेमकं असं काय झालंय... हार्दिक अन् नताशाचा होणार घटस्फोट?

शुक्रवारी चेन्नईमध्ये हवामान स्वच्छ आहे, त्यामुळे तेथे पावसाची शक्यता कमी आहे. पण जर सामन्यात पाऊस पडला आणि सामना पाच-पाच षटकाचाही झाला नाही तर सामना रद्द होईल. असे झाल्यास गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ अंतिम फेरीत पोहोचेल. म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद संघ फायनलमध्ये प्रवेश करेल जिथे त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. नेट रन रेटमध्ये सनरायझर्स हैदराबाद राजस्थानपेक्षा पुढे आहे, त्यामुळे फायनलमध्ये प्रवेश करेल.

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad
India Head Coach : टीम इंडियाच्या नवीन मुख्य कोचबाबत मोठी अपडेट! विश्वविजेत्या दिग्गजाने नाकारली BCCIची ऑफर

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 19 वेळा आमनेसामने आले आहेत. या काळात हैदराबादचा वरचष्मा राहिला आहे. सनरायझर्स हैदराबादने 19 पैकी 10 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्सने 19 पैकी केवळ 9 सामने जिंकले आहेत. आता शुक्रवारी होणाऱ्या या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार हे पाहायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com