Yashasvi Jaiswal Sunil Gavaskar : जैसवालला आताच भारतीय संघात घ्या नाही तर... गावसकरांनी दिला इशारा

Yashasvi Jaiswal Sunil Gavaskar
Yashasvi Jaiswal Sunil Gavaskar esakal

Yashasvi Jaiswal Sunil Gavaskar : राजस्थान रॉयल्स 2023 च्या आयपीएल हंगामात प्ले ऑफच्या शर्यतीत फार मागे पडले आहे. यंदाच्या हंगामात त्यांनी निराशा केली. गतवर्षीचे उपवितेते या वर्षी प्ले ऑफ देखील पार करण्याची शक्यता कमी आहे. जरी राजस्थानची कामगिरी सुमार झाली असली तरी त्यांचा सलामीवीर यशस्वी जैसवालसाठी यंदाचा हंगाम हा स्वप्नवत राहिला आहे.

त्याने हंगामात एक शतक देखील ठोकले. याचबरोबर आतापर्यंत 13 सामन्यात 166.18 च्या स्ट्राईक रेटने 575 धावा देखील ठोकल्या आहेत. यानंतर त्याला टीम इंडियाची दारे उघडण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. आता त्यात सुनिल गावसकर यांनी देखील उडी घेतली आहे.

Yashasvi Jaiswal Sunil Gavaskar
PBKS vs RR LIVE : राजस्थानच्या वेगवान माऱ्यासमोर पंजाबची टॉप ऑर्डर ढेपाळली

सुनिल गावसकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले की, 'जर फलंदाज टी 20 क्रिकेटमध्ये 20 - 25 चेंडूत 40 - 50 धावा करत असल्यास तो संघासाठी चांगली कामगिरी करत असतो. मात्र तो सलामीवीर असेल आणि तुम्ही त्याच्याकडून 15 षटके खेळण्याची अपेक्षा करत असाल आणि तो शतकी खेळी करत असेल तर संघ आरामात 190 ते 200 धावांचा टप्पा पार करते. ज्या प्रकारे यशस्वी जैसवलाने यंदाच्या हंगामात फलंदाजी केली आहे. ते पाहून मी खूप खूष आहे. तो तांत्रिकदृष्ट्या सक्षम फलंदाज देखील आहे.'

गावसकर पुढे म्हणाले की 'मला वाटते की तो आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी तयार आहे त्याला संधी मिळायला हवी. ज्यावेळी एखादा खेळाडू फॉर्ममध्ये असतो त्यावेळी त्याला संधी मिळणे गरजेचे असते. त्यांचा आत्मविश्वास गगणाला भिडलेला असतो. आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना कायम मनात मी आंतरराष्ट्रीय स्तरासाठी तयार आहे की नाही अशी शंका असते. जर तुमचा फॉर्म चांगला नसेल तर ही शंका जास्तच बळावते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पदार्पणावेळी फॉर्ममध्ये असणे गरजेचे आहे.'

Yashasvi Jaiswal Sunil Gavaskar
WTC Final 2023 : भारताचं टेन्शन वाढलं... WTC Final इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाला मिळणार झुकतं माप?

यशस्वी जैसवाल सध्या आयपीएल हंगामातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या पुढे फाफ ड्युप्लेसिस (702) आणि गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल (576) पुढे आहे.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com