Sunil Gavaskar : गेल्या हंगामापासून MI साठी ही मोठी समस्या झाली आहे... गावसकरांनी सांगितलं घोडं कुठं अडलंय

IPL 2023 Sunil Gavaskar
IPL 2023 Sunil Gavaskar esakal

IPL 2023 Sunil Gavaskar : मुंबई इंडियन्ससाठी गेला आयपीएल हंगाम हा खूप खराब गेला होता. यंदाच्या हंगामात मुंबईच्या फॅन्सना मुंबई सेलिब्रेशनची संधी देईल असे वाटत होते. मात्र मुंबई इंडियन्सने गेल्या हंगामाचा कित्ता याही हंगामातील पहिल्या दोन सामन्यात गिरवला. मुंबईच्या पदरी पहिल्या दोन सामन्यात पराभवच आला.

IPL 2023 Sunil Gavaskar
DC vs MI Arjun Tendulkar : आज अर्जुन तेंडुलकरचं नशीब उघडणार... रोहित शर्मा संधी देणार?

या पराभवानंतर भारताचे दिग्गज माजी फलंदाज सुनिल गावसकर यांनी मुंबईच्या पराभवाच्या कारणांची चिरफाड केली. या चिरफाडीनंतर सुनिल गावसकर यांनी पाचवेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईंच घोडं कुठं अडलंय हे सांगितले. गावसकरांच्या मते मुंबईला भागीदारी रचण्यात अपयश येत आहे आणि हीच गोष्ट त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरत आहे.

सुनिल गावसकर स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमावेळी बोलताना म्हणाले, 'गेल्या हंगामापासून आतापर्यंत मुंबईची एकच समस्या राहिला आहे. ती म्हणजे भागीदारी! जर तुम्ही मोठ्या भागीदारी रचल्या नाहीत तर तुम्हाला मोठी धावसंख्या उभारता येणार नाही.'

IPL 2023 Sunil Gavaskar
IPL 2023 : विराट कोहलीला आऊट करताना मिश्राने केली मोठी चूक; BCCI करणार कारवाई?

गावसकर पुढे म्हणाले की, 'या बाबतीत मुंबई सातत्याने अपयशी ठरत आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन छोटी पण उपयुक्त भागिदारी रचून मुंबईसाठी मोठी धावसंख्या उभारण्यास मदत करू शकतात. मात्र ते यात अपयशी ठरत आहेत.'

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com