
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने ११ वर्षांनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे श्रेयसच्या नावावर तीन वेगवेगळ्या फ्रँचायझींना आयपीएल प्लेऑफमध्ये नेणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
त्याने यापूर्वी २०१९ आणि २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल प्लेऑफपर्यंत पोहचवले होते. तसेच आयपीएल २०२४ मध्ये त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपदही जिंकले. पण असे असतानाही त्याला २०२४ मध्ये योग्य ते श्रेय मिळाले नसल्याचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटले आहे.