SRH vs RCB IPL 2024 : शाहबाज अन् कमिन्सची एकाकी झुंज व्यर्थ; आरसीबीने 6 पराभवानंतर पाहिला विजय

SRH vs RCB Live IPL 2024
SRH vs RCB Live IPL 2024esakal

शाहबाज एकटा लढला

शाहबाज अहमदनं शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली मात्र हैदराबादला 20 षटकात 8 बाद 171 धावापर्यंतच मजल मारता आली. आरसीबीनं सामना 35 धावांनी जिंकून आपली सलग सहा पराभवाची मालिका खंडित केली.

SRH vs RCB IPL 2024 : शाहबाज अन् कमिन्सची एकाकी झुंज व्यर्थ; आरसीबीने 6 पराभवानंतर पाहिला विजय

हैदराबादची अवस्था 6 बाद 84 धावा अशी झाली होती. मात्र त्यानंतर शाहबाज अहमद आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला 14 षटकात 124 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र ग्रीनने ही जोडी फोडून हैदराबादच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं.

SRH vs RCB Live IPL 2024 : आरसीबीच्या गोलंदाजांनी केली कमाल; घरच्या मैदानावर हैदराबादची उडाली दाणादाण

आरसीबीच्या गोलंदाजांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सर्वात कमकूवत गोलंदाजी म्हणून हिणवल्या गेलेल्या आरसीबीच्या गोलंदाजांनी हैदराबादची अवस्था 6 बाद 89 धावा अशी केली. स्वप्निल सिंह आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर विल आणि यश दयालने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

SRH vs RCB Live IPL 2024 : ग्रीनची फटकेबाजी; आरसीबी कशीबशी 200 च्या जवळ पोहचली

सनराईजर्स हैदराबादने आरसीबीच्या फलंदाजांवर अंकुष ठेवला होता. मात्र कॅमरून ग्रीनने स्लॉग ओव्हरमध्ये फटेकबाजी करत आरसीबीला 200 धावांच्या जवळ पोहचवलं. त्यानंतर शेवटच्या षटकात स्वप्निल सिंहनं नटराजनला एक षटकार एक चौकार मारला. मात्र तो शेवटच्या चेंडूवर बाद झाला. आरसीबीने 20 षटकात 7 बाद 206 धावांपर्यंत मजल मारली.

SRH vs RCB Live IPL 2024 : रजत पाटीदार अन् विराट बाद झाल्यानंतर आरसीबीची धावगती मंदावली

आरसीबीला दोन धक्के बसल्यानंतर रजत पाटीदार आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी 65 धावांची आक्रमक भागीदारी रचली. पाटीदराने 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं. विराटनं देखील 50 धावा केल्या. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर आरसीबीची धावगती मंदावली.

नटराजननं दिला पहिला धक्का 

टी नटराजननं आरसीबीची सलामी जोडी फोडली. त्यानं फाफ ड्युप्लेसिसला 25 धावांवर बाद केले.

आरसीबीची आक्रमक सुरूवात 

रॉयल चॅलेंजर बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फाफ ड्युप्लेसिस आणि विराट कोहलीने पहिल्या चार षटकातच संघाला अर्धशतकाजवळ पोहचवलं.

विराट पुन्हा शतक ठोकणार? 

हैदराबादमध्ये गेल्या दोन सामन्यात विराट कोहलीने चेस करताना दोन शतकी खेळी केल्या होत्या. आजच्या सामन्यातही आरसीबी फॅन्सच्या विराटकडून अशाच काहीशा अपेक्षा असतील.

SRH vs RCB : हेड टू हेड 

या दोघांनी आतापर्यंत एकमेकांविरूद्ध 23 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यातील 10 सामन्यात आरसीबी तर 12 सामन्यात हैदराबाद जिंकली आहे. एक सामना टाय झाला होता.

Sunrisers Hyderabad Vs Royal Challengers Bengaluru Live Cricket Score : 

रॉयल चॅलेंजर बंगळुरूने सनराईजर्स हैदराबादचा 35 धावांनी पराभव करत आयपीएल 2024 मधील आपली सलग सहा पराभवाची मालिका अखेर खंडित केली. प्रथम फलंदाजी करत आरसीबीने हैदराबादसमोर विजयासाठी 207 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हैदराबादच्या संघाला 20 षटकात 8 बाद 171 धावाच करता आल्या.

हैदराबादकडून शाहबाज अहमदनं सर्वाधिकी 40 तर पॅट कमिन्स आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 31 धावा केल्या. आरसीबीकडून कॅमरून ग्रीन, स्वप्निल सिंह आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

सनराईजर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूनं 20 षटकात 7 बाद 206 धावा केल्या. विराट कोहलीने 43 चेंडूत 51 धावा केल्या. तर रजत पाटीदारनं 20 चेंडूत 50 धावांचे योगदान दिले. स्लॉग ओव्हरमध्ये कॅमरून ग्रीनने 20 चेंडूत 37 धावा चोपल्या. त्याला दिनेश कार्तिकने 6 चेंडूत 11 तर स्वप्निल सिंहने 6 चेंडूत 12 धावा करून चांगली साथ दिली. हैदराबादकडून जयदेव उनाडकटने 3 तर टी. नटराजनने 2 विकेट्स घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com