
पाचवेळचे विजेत्या मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफ गाठणारा मुंबईचा चौथा संघ ठरला. त्यामुळे आता आयपीएल २०२५ मधील अंतिम ४ संघ निश्चित झाले असून इतर ६ संघांचे आव्हान संपले आहे.
मुंबईने बुधवारी (२१ मे) वानखेडे स्टेडियवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात ५९ धावांनी विजय मिळवला. मुंबईच्या या विजयात सूर्यकुमार यादवने मोलाची भूमिका बजावली.