T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपच्या शेड्यूलमध्ये गडबड, 24 तासांपेक्षा कमी अंतरात सेमीफायनल अन् फायनल?

T20 World Cup 2024 Schedule : यंदा वेस्ट इंडिज आणि यूएसए टी-20 वर्ल्ड कप 2024 सह यजमानपद भूषवणार आहेत. टी-20 क्रिकेटचा हा महाकुंभ 1 जूनपासून सुरू होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे.
T20 World Cup
T20 World Cup sakal

T20 World Cup 2024 Schedule : यंदा वेस्ट इंडिज आणि यूएसए टी-20 वर्ल्ड कप 2024 सह यजमानपद भूषवणार आहेत. टी-20 क्रिकेटचा हा महाकुंभ 1 जूनपासून सुरू होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे. आणि उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. यादरम्यान आता वर्ल्ड कपचे वेळापत्रक चर्चेत आले आहे.

T20 World Cup
Team India Head Coach : टीम इंडिया नवीन कोचच्या शोधात; पगारापासून ते वयापर्यंत, BCCIने ठेवल्या 'या' कडक अटी

जून महिन्यात कॅरिबियन बेटांवर तापमान खूप जास्त असते आणि उष्णतेचा त्रास होतो. त्यामुळे पावसाची शक्यता कमी आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि क्रिकेट वेस्ट इंडिज राखीव दिवस का ठेवला आहे.

पाऊस पडला तरच दुसरा उपांत्य फेरी सामना राखीव दिवशी म्हणजेच (28 जून) घेतला जाईल, पण सामना जिंकणाऱ्या संघाला विश्रांती मिळणार नाही कारण अंतिम फेरी दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 जून रोजी खेळला जाणार आहे. म्हणजे एखाद्या संघाला 24 तासांपेक्षा कमी वेळात अंतिम सामना खेळावा लागेल.

T20 World Cup
IPL 2024 : नाद करा पण आमचा कुठं! RCBनं विजयाचा 'पंच' मारला तरी कसा? संघाच्या हुकमी एक्क्यानेच केलाय खुलासा

अशा परिस्थितीत दुसरा उपांत्य सामना जिंकणाऱ्या संघाला जॉर्जटाउन ते बार्बाडोस हे अंतर 24 तासांत पूर्ण करावे लागेल, जे 750 किमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या अन्य संघाला विश्रांतीसाठी वेळ मिळणार नाही.

टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी आयसीसी अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आल्याची पुष्टी झाली. तरीही राखीव दिवसामुळे २४ तासांत उपांत्य आणि अंतिम सामने होण्याची शक्यता असली तरी यासंदर्भात आयसीसीकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

T20 World Cup
IPL 2024 Playoffs : प्लेऑफच्या शर्यतीतून 3 संघ बाहेर, 1 क्वालिफाय, 'या' 6 संघाचे मालक टेन्शनमध्ये

गेल्या वर्षी भारतात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com