IPL मध्येच मिळाला भारताचा पुढचा कर्णधार, 'हा' अष्टपैलू लवकरच घेणार हिटमॅनची जागा | Team India New Captain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rohit sharma

IPL मध्येच मिळाला भारताचा पुढचा कर्णधार, 'हा' अष्टपैलू लवकरच घेणार हिटमॅनची जागा

IPL 2022: भारतात खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगकडे संपूर्ण जगाच्या नजर लागले आहे. यंदा हार्दिक पांड्याचा कर्णधार असलेल्या गुजरात टायटन्सची कामगिरी आयपीएलमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम ठरली आहे. दुसरीकडे रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सची कामगिरी सर्वात वाईट ठरत आहे. मुंबईच्या खराब स्थितीनंतर रोहितच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशा परिस्थितीत रोहितच्या जागी लवकरच नवा खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार होईल, असा अंदाज एका अनुभवी खेळाडूने व्यक्त केले आहे.

'हा' खेळाडू घेणार रोहितची जागा

IPL 2022 मध्ये गुजरातमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी आतापर्यंत अप्रतिम राहिली आहे. गुजरातने 6 पैकी 5 सामने जिंकले आहे. गुजरातच्या यशात कर्णधार हार्दिकचा मोठा वाटा आहे. हार्दिकवर प्रभावित होऊन ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने येत्या दोन वर्षांत हार्दिक टीम इंडियाचा कर्णधार होईल, हॉगने आपल्या यूट्यूब चॅनल वरून हे भविष्वाणी केले.

हॉगने आपल्या यूट्यूब चॅनल बोलताना म्हणाला, दोन वर्षांच्या कालावधीत पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व केल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. तो एक लीडर आहे, दबावाखाली तो चांगले कामगिरी करतो. संघा वरचा दबाव सहन करताना दिसत आहे. हॉग हार्दिकच्या कर्णधारपदावर इतका खूश आहे की तो त्याच्याकडे टीम इंडियाचा पुढचा कर्णधार म्हणून पाहत आहे.

हार्दिक पांड्या नोव्हेंबरमध्ये दुबई येथे झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत नामिबियाविरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर गोलंदाजीचा भार पेलण्यासाठी तो संघर्ष कर होता. पंड्या म्हणाला, सध्या मी आयपीएलमध्ये खेळतोय आणि माझं लक्ष आयपीएलवर आहे, मग बघू भविष्य कुठं नेतं. ते अजून माझ्या हातात नाही.

Web Title: Team India New Captain Hardik Pandya Gujarat Titans Rohit Sharma Sports Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top