सुर्यकुमार यादवचे कर्णधारपद जाणार? IPL 2026 गाजवणारा भारतीय कॅप्टन होणार,Bcci चा मास्टरप्लान

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म आणि मनगटाच्या दुखापतीमुळे बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी टी-२० कर्णधारपदात बदल होऊ शकतो.
Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

esakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ नंतर होणाऱ्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी निवड समिती सूर्यकुमार यादवला टी-२० कर्णधारपदावरून हटवण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय संघाचा टी-२० कर्णधार हा सूर्यकुमार यादव आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी सूर्यकुमार यादवचा फॉर्म हा निवड समितीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाची कामगिरी या वर्षी खराब ठरली आहे. चालू आयपीएल हंगामात देखील त्याची कामगिरी फारशी चांगली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com