esakal | टायगर अभी जिंदा है! धोनीच्या तडाखेबंद खेळीवर खास प्रतिक्रिया | MS Dhoni
sakal

बोलून बातमी शोधा

MS-Dhoni-Attitude

टायगर अभी जिंदा है! धोनीच्या तडाखेबंद खेळीवर खास प्रतिक्रिया

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 Qualifier 1: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतरच्या IPLमध्ये धोनीच्या CSKने खराब कामगिरी केली. पण सध्या सुरू असलेल्या IPL मध्ये धोनी आणि चेन्नईच्या संघाने धडाकेबाज पुनरागमन केले. प्ले ऑफच्या पहिल्या सामन्यात कर्णधार धोनीने शेवटच्या षटकात तब्बल ३ चौकार आणि १ षटकार खेचत संघाला चित्तथरारक विजय मिळवून दिला. धोनीने आपल्या टीकाकारांना दिल्लीविरूद्धच्या सामन्यात दमदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर धोनीवर स्तुतीचा वर्षाव झाला.

हेही वाचा: 'ग्लॅमरस IPL' ... मॅचपेक्षाही 'या' तरूणींच्या अदांचीच चर्चा!

"ओम फिनिशाय नम: ! टायगर अभी जिंदा है. चेन्नईने धडाकेबाज विजय मिळवला. ऋतुराजने अप्रतिम खेळी केली. उथप्पाच्या अनुभवाचाही संघाला फायदा झाला. आणि धोनीने पुन्हा एकदा दाखवून दिलं की दडपणाच्या स्थितीत थंड डोक्याने केलेला खेळ किती महत्त्वाचा असतो. चेन्नईला मिळालेला विजय दमदारच आहे. गेल्या हंगामात अतिशय खराब कामगिरी केल्यानंतर चेन्नईने केलेले पुनरागमन वाखाणण्याजोगे आहे", अशा शब्दात विरेंद्र सेहवागने धोनीच्या खेळीची आणि चेन्नईच्या विजयाची स्तुती केली.

हेही वाचा: Video: चिमुरडी ढसाढसा रडली; मग माहीनेच फुलवलं चेहऱ्यावर हसू!

दरम्यान, धोनी दिल्लीविरूद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड बाद झाल्यावर आला. त्यावेळी रविंद्र जाडेजाचा पर्याय असतानाही त्याने स्वत: फलंदाजीला येणं पसंत केलं. धोनीने दुसऱ्याच चेंडूवर एक उत्तुंग षटकार लगावला. त्यानंतर शेवटच्या षटकात टॉम करनने पहिल्या चेंडूवर मोईन अलीला बाद केलं. त्यावेळी धोनीला स्ट्राईक मिळाली. त्याचा फायदा घेत धोनीने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकारांची हॅटट्रिक लगावत संघाला विजय मिळवून दिला.

loading image
go to top