IPL 2024: सेम टू सेम! क्लासेन-हेडने जशी प्रॅक्टिस केली, तसेच शॉट्स RCB विरुद्ध मारले; Video एकदा पाहाच

Sunrisers Hyderabad Video: आयपीएलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात क्लासेन आणि हेड जशी प्रॅक्टिस करतात, तसेच सामन्यात शॉट्स मारताना दिसत आहेत.
Heinrich Klaasen | IPL  | SRH
Heinrich Klaasen | IPL | SRHX/IPL

Sunrisers Hyderabad Video: सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 30 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्ल बेंगळुरू संघाला 25 धावांनी पराभूत केले. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मिळवलेल्या या विजयात हैदराबादसाठी हेन्रिक क्लासेन आणि ट्रेविस हेड यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यांनी या सामन्यात तोबडतोड खेळी केल्या.

विशेष म्हणजे या सामन्यापूर्वी क्लासेन आणि हेडने सराव सत्रावेळी नेट्समध्ये ज्या काही शॉट्सचा सराव केला होता, अगदी तसेच हुबेहुब शॉट्स त्यांनी बेंगळुरूविरुद्ध फलंदाजी करताना मारले.

याचा व्हिडिओही आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर युजर्सने अनेक कमेंट्स केल्या असून क्लासेन आणि हेडचे कौतुकही केले आहे. तसेच अनेकांनी सरावानेच परिपूर्णता येते असेही म्हटले आहे.

Heinrich Klaasen | IPL  | SRH
Team India Squad T20 WC : विराट कोहली वर्ल्ड कपमध्ये रोहितचा ओपनिंग पार्टनर? 'या' 4 खेळाडूंनी ठोकली दावेदारी...

या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 287 धावा केल्या होत्या. या आयपीएलमध्ये एखाद्या संघाने उभारलेल्या सर्वोच्च धावा आहेत.

हैदराबादकडून या सामन्यात ट्रेविस हेडने 41 चेंडूत 102 धावांची शतकी खेळी केली होती. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 षटकार मारले. तसेच हेन्रिक क्लासेनने 31 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 7 षटकार मारले.

याशिवाय अभिषेक शर्मा (34), एडेन मार्करम (32) आणि अब्दुल सामद (37) यांनीही छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. बेंगळुरूकडून लॉकी फर्ग्युसनने 2 विकेट्स घेतल्या.

Heinrich Klaasen | IPL  | SRH
RCB साठी लढलेल्या दिनेश कार्तिकचं प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या गजरात कौतुक, चिन्नास्वामी मैदानातील Video Viral

त्यानंतर 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरुनेही 20 षटकात 7 बाद 262 धावा केल्या. बेंगळुरुकडून दिनेश कार्तिकने 35 चेंडूत 83 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 7 षटकार मारले.

याशिवाय कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही 28 चेंडूत 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच विराटने 20 चेंडूत 42 धावांची खेळी केली. परंतु, त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणाला खास काही करता आले नाही.

हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मयंक मार्कंडेने 2 विकेट्स घेतल्या, तर टी नटराजनने 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com