Vaibhav Suryavanshi Meets PM Modi After Blazing IPL 2025 Debut : इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांचंच लक्ष वेधणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे. पाटण्यातील जय प्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही झाली. यावेळी वैभवने पंतप्रधान मोदी यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीदरम्यान वैभवचे आईवडीलदेखील उपस्थित होते.