

Danish Malewar and Praful Hinge
esakal
आयपीएलमध्ये विदर्भाच्या दोन युवा खेळाडूंचा बोलबाला होणार आहे. यंदाच्या मेगा लिलावात विदर्भाचे दोन प्रतिभावान क्रिकेटपटू विकले गेले असून, त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विदर्भाचा २१ वर्षीय फलंदाज दानिश मालेवार हा लवकरच मोठ्या क्रिकेटच्या मैदानात आपली छाप पाडणारा खेळाडू वाटतो. नुकताच सुरू झालेल्या २०२५-२६ देशांतर्गत हंगामात त्याने दुलीप करंडक स्पर्धेत पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात उत्तर पूर्व झोनविरुद्ध मध्य झोनकडून नाबाद १९८ धावांची खेळी साकारली. बेंगळुरूच्या मैदानावर त्याने ३५ चौकार आणि एक षटकार लगावत आपली उपस्थिती दाखवून दिली. हा सामना मध्य झोनने आरामात नियंत्रणात ठेवला, कारण दुसऱ्या दिवसअखेर त्यांनी २ बाद ४३२ धावा केल्या होत्या.