
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघात ५४ वा सामना सुरू आहे. या सामन्यात पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी आक्रमक शॉट्स खेळत मोठी धावसंख्या उभारली.
धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात पंजाबने लखनौला २३७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंगने वादळी अर्धशतक ठोकले. त्याचबरोबर शशांक सिंगकडूनही आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली.