
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आपलं वर्चस्व सिद्ध करत क्वालिफायर २ सामन्यात प्रवेश केला आहे. मुंबईने शुक्रवारी (३० मे) गुजरात टायटन्स संघाविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात २० धावांनी विजय मिळवला.
या विजयासह आता मुंबईने ६ वे विजेतेपद मिळवण्यासाठी दावेदारी ठोकली आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करताना गुजरातला विजयापासून ठेवले. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यादरम्यानचा जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे.