
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी (७ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला १२ धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर झाला होता. त्यामुळे या सामन्यासाठी बंगळुरू संघ मुंबईत होता. या सामन्यादरम्यानचा एक खास व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.