
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध विक्रमी विजय मिळवला आणि इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) स्पर्धेत क्वालिफायर १ मध्ये प्रवेशही मिळवला आहे.
लखनौमध्ये झालेल्या या सामन्यात बंगळुरूने तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा पराक्रम केला. त्यांनी तब्बल २२८ धावांचा ८ चेंडू आणि ६ विकेट्स राखून यशस्वी पाठलाग केला होता. बंगळुरूच्या या विजयात प्रभारी कर्णधार जितेश शर्माने मोलाचा वाटा उचलला. मात्र या सामन्यात एक वादग्रस्त घटनाही घडली.