Virat Kohli | बॅडपॅचमधल्या विराटला शोएबने दिला खास सल्ला | Virat Kohli Bad Patch Former Pacer Shoaib Akhtar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Bad Patch Former Pacer Shoaib Akhtar

Virat Kohli | बॅडपॅचमधल्या विराटला शोएबने दिला खास सल्ला

आयपीएलच्या (IPL) इतिहासात सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली (Virat Kohli) सध्या फॉर्मसाठी झगडत आहे. 15 व्या हंगामात तो एक एक धाव करताना चाचपडत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत आरसीबीच्या (RCB) झालेल्या 11 सामन्यात त्याला 216 धावाच करता आल्या आहेत. विराट कोहली सनराईजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकवर बाद झाला. त्यामुळे विराट बॅडपॅचमधून बाहेर पडतोय की अजून अडकतोय अशी शंकेची पाल चाहत्यांच्या मनात चुकचुकली. दरम्यान, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) विराटच्या बॅडपॅटबदद्ल आपले मत व्यक्त केले.

शोएब अख्तर म्हणाला की, विराट कोहली स्वतःवर जास्ताच दबाव टाकत आहे. विराटला दबाव झुगारून देऊन आपला खेळ एन्जॉय करण्याचा सल्ला अख्तरने दिला. शोएब अख्तरने स्पोट्स कीडाच्या यूट्यूब चॅनेलशी बोलताना सांगितले की, 'विराट कोहली एक महान खेळाडू आहे. त्याला कोणालाही काही सिद्ध करून दाखवायची गरज नाही. सध्या विराट स्वतःवर जास्त दबाव (Pressure) घेत आहे. त्यामुळे तो जवळपास एकाच स्टाईलने बाद होतोय. तो खेळाचा आनंद घेत नाहीये. त्याला दबाव न घेता आपल्या खेळाचा आनंद घेतला पाहिजे. आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे की एक व्यक्ती नक्की फेल होतो. मात्र विराट कोहली सारखा दिग्गज फेल झाल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करतो.'

आईपीएल 2022 विराट कोहलीसाठी फारसा चांगला जात नाहीये. दरम्यान, विराट कोहलीच्या बॅडपॅचवर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील विराटने आता विश्रांती घ्यायला हवी असे मत व्यक्त केले होते.