
IPL 2022 मध्ये विराटने शुभमन गिलला 'गळा कापण्याचा' दिला इशारा - Video
आयपीएलचा 67 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. बंगळुरूने सामन्यात एकतर्फी विजय मिळवत. प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहे. मैदानात फील्डिंग करत असताना विराट कोहली त्यांच्या जुन्या अवतारात पाहिला मिळाला. विराट फील्डिंग दरम्यान अंडरटेकरची कॉपी करताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. (virat kohli batsmen with undertaker iconic throat shubman gill)
हेही वाचा: प्लेऑफमध्ये पोचण्यासाठी DC ला विजय आवश्यक; अर्जुन तेंडुलकरला मिळणार संधी!
विराट कोहली WWE चा खूप मोठा चाहता आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना कोहलीने शुभमन गिलला WWE स्टार अंडरटेकरचा 'गळा कापण्यासाठी' इशारा केला. अंडरटेकरच्या गळ्यातील स्लॅशची कॉपी करण्याची ही पहिलीच वेळ नाही, या हंगामातील लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही विराट असाच करताना दिसला होता. कोहलीचा गळा कापल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा: 16 वर्षीय भारतीयाचा धमाका; वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनचा दुसऱ्यांदा केला पराभव
गुजरात टायटन्सविरुद्ध गुरुवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात विराट कोहली परत फॉर्ममध्ये आला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 54 चेंडूत 73 धावा केल्या, यामध्ये 8 चौकार आणि 2 षटकार हे मारले. आयपीएल 2022 मधील विराट कोहलीचे हे दुसरे अर्धशतक होते. कोहलीने आतापर्यंत14 सामन्यांत 23.77 च्या सरासरीने 309 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये कोहली तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. बेंगळुरू अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे, पण प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा त्यांचा निर्णय दिल्ली आणि मुंबई सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे.
Web Title: Virat Kohli Batsmen With Undertaker Iconic Throat Shubman Gill Slash During Rcb Vs Gt Ipl 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..