विराटनं धावांच्या दुष्काळातून जाणाऱ्या ऋतुराजच्या खांद्यावर टाकला हात

Virat Kohli hand on Ruturaj Gaikwad Shoulder
Virat Kohli hand on Ruturaj Gaikwad Shoulder ESAKAL

नवी मुंबई : आयपीएलच्या 22 व्या सामन्यात दोन स्टार संघ चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात हाय व्होल्टेज सामना झाला. या सामन्यात सीएसकेने आरसीबीचा 23 धावांनी पराभव केला. सीएसकेने शिवम दुबेच्या तडाखेबाज 93 तर अनुभवी रॉबिन उथप्पाच्या 88 धावांच्या जोरावर 216 धावा केल्या. सीएसकेचा स्टार ओपनर ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. दरम्यान, सामना संपल्यानंतर आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) ऋतुराजच्या खांद्यावर हात टाकून त्याला अनुभवाचे बोल सांगताना दिसला.

Virat Kohli hand on Ruturaj Gaikwad Shoulder
VIDEO: शेवटच्या षटकात सहा चेंडूत सहा विकेट; स्लॉग ओव्हरमध्ये हवा असा बॉलर!

ऋतुराज गायकवाड हा आयपीएल 2021 चा ऑरेंज कॅप होल्डर फलंदाज आहे. त्याने 2021 च्या हंगामात तब्बल 635 धावा केल्या होत्या. मात्र यंदाच्या हंगामात त्याला चांगली सुरूवात करता आलेली नाही. गेल्या पाच सामन्यात ऋतुराजला फक्त 35 धावा करता आल्या आहेत. दरम्यान, आरसीबी आणि सीएसकेचा सामना संपल्यानंतर विराट कोहली ड्रेसिंगरूममध्ये जात असताना ऋतुराजच्या खांद्यावर हात टाकून त्याला अनुभवाचे बोल सांगत असताना दिला. याबाबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विराट कोहली बहुदा गायकवाडचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत असावा. विराट कोहलीच्या या कृतीचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.

Virat Kohli hand on Ruturaj Gaikwad Shoulder
Bundesliga च्या इतिहासात पहिल्यांदाच रेफ्रीनं सूर्यास्ताला खेळ थांबवला

तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने हंगामातील आपला पहिला विजय साजरा केला. विशेष म्हणजे सलग 4 पराभवानंतर सीएसकेला विजयाची चव चाखता आली आहे. या सामन्यात रॉबिन उथप्पा (88) आणि शिवम दुबेने (93) आपल्या आयपीएल कारकिर्दितील सर्वोत्तम खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 165 धावांची भागिदारी रचली. चेन्नईकडून तीक्षाणाने 4 तर रविंद्र जडेजाने 3 विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com