Sydney Sixers’ social media post about Virat Kohli : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग (BBL) मधील सिडनी सिक्सर्स संघातून खेळणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. BBL मधील सिडनी सिक्सर्स संघाने मंगळवारी कोहलीचा फोटो पोस्ट करून त्याला पुढील दोन हंगामांसाठी संघात करारबद्ध केल्याचे जाहीर केले. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, "विराट कोहली आता अधिकृतपणे सिक्सर बनला आहे, पुढील दोन हंगामांसाठी करार!" या घोषणेमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.