esakal | IPL 2021: विराटने 'ती' घटना पाहताच चक्क बसल्या जागेवरून मारली उडी
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli-Shocked

विराटने स्वत: मेसेज करून दिली घडलेल्या प्रकाराची माहिती

विराटने 'ती' घटना पाहताच चक्क बसल्या जागेवरून मारली उडी

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 Qualifier 1: महत्त्वाच्या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दिल्ली पराभूत झाल्यामुळे आता त्यांना फायनलमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. रविवारच्या सामन्यात पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने १७२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांची अर्धशतके आणि महत्त्वाच्या क्षणी धोनीने केलेली फटकेबाजी याच्या जोरावर CSK ने विजय मिळवला.

हेही वाचा: धोनीच्या खेळीची दिल्लीच्या कोचलाही पडली भुरळ, म्हणाला...

धोनीने दिल्लीविरूद्धच्या सामन्यात ६ चेंडूत नाबाद १८ धावा केल्या. धोनीने आपल्या डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर एक उत्तुंग षटकार लगावला. त्यानंतर शेवटच्या षटकात टॉम करनला दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकारांची हॅटट्रिक लगावत संघाला विजय मिळवून दिला. "(धोनीची खेळी पाहून असं वाटतंय की) किंग परत आलाय! धोनी हा खरंच क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर आहे. धोनीच्या खेळीमुळे मला बसल्या जागेवरून चक्क उडी मारायला भाग पाडलं. मला धोनीची खेळी पाहून खूप आनंद झाला", असं ट्वीट विराटने केलं.

हेही वाचा: 'ग्लॅमरस IPL' ... मॅचपेक्षाही 'या' तरूणींच्या अदांचीच चर्चा!

दरम्यान, दिल्लीच्या संघाकडून पृथ्वी शॉ ने सर्वाधिक ३४ चेंडूत ६० धावा केल्या. तर ऋषभ पंतने ३५ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. तर चेन्नईच्या जोश हेजलवूडने २ बाद २९ अशी कामगिरी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाडने ५० चेंडूत नाबाद ७० धावा केल्या. तर रॉबिन उथप्पाने ४४ चेंडूत ६३ धावा केल्या. अखेरीस धोनीने विजयी फटकेबाजी केली.

loading image
go to top