कोहली 'झुकेगा नहीं'; विक्टोरीनं लीक केली RCB च्या ताफ्यातील 'खबर'

Virat Kohli
Virat KohliSakal

IPL-2022 च्या 15 व्या हंगामाचे वेळापत्रक समोर आले असले तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन कोण? याच उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) मागील सात वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचे नेतृत्व केले होते. पण त्याने अचानकच कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. 33 वर्षीय विराट कोहली आंतरराष्ट्रीय सामन्याप्रमाणेच आयपीएलमध्येही एक फलंदाज म्हणून मैदानात उतरणार आहे.

दरम्यान RCB चे चाहते पुन्हा एकदा विराट कोहलीला कॅप्टन्सीच्या रुपात पाहायला उत्सुक असल्याचे दिसून येते. कोहलीलाच कॅप्टन करावे, अशी मागणीही होत आहे. त्यामुळे पुन्हा विराट संघाचे नेतृत्व करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण यावर आरसीबीचा माजी खेळाडू डॅनियल विक्टोरी याने मोठे वक्तव्य केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांना पुन्हा विराटला कॅप्टनच्या रुपात पाहायचे असले तरी ते शक्य नाही. फ्रँचायझी पर्यायी कॅप्टनचा शोध घेत आहे, असे त्याने म्हटले आहे.

Virat Kohli
लंकेला ढेर करण्यासाठी 5 कसोटीत 36 विकेट घेणारा 'शेर' संघात

ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीमध्ये डॅनियल विटोरी म्हणाला की, विराट कोहली पुन्हा कॅप्टन होणार नाही. ही गोष्ट सोपी नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा फ्रँचायझी क्रिकेट तुम्ही एकदा निर्णय घेतला की तुम्हाला माघार घेता येत नाही. कोहलीही माघार घेणार नाही. त्याच्या जागी तिघांची नावे कॅप्टन्सीच्या शर्यतीत असतील, असा अंदाजही वर्तवला. ग्लेन मॅक्सवेलसह फाफ ड्युप्लेसिस आणि दिनेश कार्तिक यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे विक्टोरीनं म्हटलं आहे.

Virat Kohli
IPL Schedule 2022 : साखळी सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

BCCI ने नुकतेच आयपीएल 2022 मध्ये होणाऱ्या 15 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला सामना 27 मार्चला पंजाब किंग्ज विरुद्ध रंगणार आहे. नवी मुंबईकीव डिवाय पाटील स्टेडियमवरील सामन्याने ते स्पर्धेला सुरुवात करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com