Ishan Kishan’s Unexpected Dig at Mohammad Rizwan : सनरायझर्स हैदराबादचा (SRH) स्टार खेळाडू इशान किशनने आयपीएल २०२५ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा वन डे संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवानला ट्रोल केले आहे. माजी आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी यांच्याशी गप्पा मारताना इशानने रिझवानच्या यष्टिरक्षणावरील सवयीवर खोचकपणे भाष्य केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.