
PBKS vs RCB: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून प्लेऑफला सुरुवात होणार आहे. साखळी फेरीत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळावे.
अखेर ७० सामन्यांनंतर पहिल्या चार संघांवर शिक्कामोर्तब झाले असून आता २९ मे पासून प्लेऑफमधील सामने सुरु होतील. साखळी फेरीवेळी काही सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यामुळे आता प्लेऑफमधील सामन्यांमध्येही पावसाचा अडथळा येणार का असा प्रश्न आहे.