
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी बहुप्रतिक्षीत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होत आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघ फलंदाजीला उतरला.
या सामन्यातून चेन्नईसाठी १७ वर्षीय आयुष म्हात्रेने आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुळचा मुंबईचा असलेला आयुष चेन्नईकडून पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. या सामन्यात रचीन रवींद्र बाद झाल्यानंतर आयुष तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्याने सुरुवातीच्या दोन चेडूंनंतर मात्र आक्रमक खेळण्यास सुरुवात केली.