

Chennai Super Kings Strengthen Line-up with Brevis Signing : चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये आतपर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी सात पैकी ५ सामने गमावले आहेत आणि प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना उर्वरित सामन्यांपैकी ५-६ विजय मिळवणे गरजेचे आहे. यंदाच्या पर्वात फलंदाजांचे अपयश हे CSK साठी डोकेदुखी ठरणारी गोष्ट बनली आहे आणि त्यामुळेच डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या येण्याने आता त्यांच्या फलंदाजी तगडी होणार आहे. ऋतुराज गायकवाडने आधीच स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे चेन्नईला मोठा धक्का बसला होता.