
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा रोमांच आता वाढत चालला आहे. स्पर्धा आता प्लेऑफच्या दिशेने जात असल्याने संघांमध्येही प्रत्येक सामन्यात चुरस दिसत आहे. आत्तापर्यंत आयपीएलच्या या हंगामात स्लो ओव्हर रेटसाठी काही कर्णधारांना दंड भरावा लागला, तर काही खेळाडूंना नियमाचा भंग केल्याने कारवाईला सामोरे जावे लागले.
यात लखनौ सुपर जायंट्सचा फिरकीपटू दिग्वेश राठी याचाही समावेश आहे. दिग्वेशने सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये विकेट घेतल्यानंतर पावती फाडावी, तशी हातावर काही लिहिल्याची कृती करत आक्रमक सेलिब्रेशन केले होते. त्यानंतर दोनवेळा त्याला बीसीसीआयकडून दंडही ठोठावण्यात आला आहे.