Yashasvi Jaiswal: ...अन् सेंच्युरीनंतर जयस्वालची ब्रायन लाराला धावत येत कडकडून मिठी, Video पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात है'

Yashasvi Jaiswal meet Brian Lara: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून शतक झळकावल्यानंतर जैस्वालने ब्रायन लारा यांना पाहताच धावत येत मिठी मारली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Yashasvi Jaiswal - Brian Lara
Yashasvi Jaiswal - Brian LaraSakal

Yashasvi Jaiswal: सोमवारी (22 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 38 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 9 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. राजस्थाच्या या विजयात 22 वर्षीय सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने महत्त्वाचे योगदान दिले.

खरंतर या सामन्यापूर्वी जैस्वालला आयपीएल 2024 मध्ये खेळलेल्या पहिल्या सातही सामन्यात अर्धशतकही करता आले नव्हते. परंतु, त्याने या सामन्यातून चांगले पुनरागमन करत शतक झळकावले. त्याच्या शतकानंतर सर्वांना त्याची फॅनबॉय मोमेंट पाहायला मिळाली.

Yashasvi Jaiswal - Brian Lara
CSK च्या पिवळ्या वादळात नाचणारा एकटा लखनौ फॅन! LSG च्या विजयानंतरचा व्हिडियो व्हायरल

झाले असे की वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज ब्रायन लारा या आयपीएलमध्ये समालोचन करत आहेत. ते सामन्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनशी बोलत होते. त्यावेळी जैस्वालने त्यांना पाहिले आणि त्याने पळत येत थेट लारा यांना कडकडीत मिठी मारली.

त्याला असे लहान मुलासारखी लारा यांना मिठी मारताना पाहून सॅमसनही चकीत झाला आणि हसायला लागला. त्यानंतर जैस्वाल आणि लारा यांनी एकमेकांची विचारपूस केली. यानंतर अखेरीस त्यांना भेटायला मिळाल्याचा आनंदही जैस्वालने व्यक्त केला.

या क्षणांचा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. तसेच हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Yashasvi Jaiswal - Brian Lara
Hardik Pandya: टी20 वर्ल्डकपपूर्वीच हार्दिकचा विक पॉइंट सापडला? तीन डावात दोनदा 'या' चेंडूवर झालाय बाद

दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर मुंबईने राजस्थान समोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग राजस्थानने 18.4 षटकात 1 विकेट गमावत 183 धावा करत सहज पूर्ण केला.

राजस्थानकडून जैस्वालने 60 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारांसह 104 धावांची नाबाद खेळी केली. त्याला आधी जॉस बटलर (35) आणि नंतर सॅमसनने (38*) चांगली साथ दिली. मुंबईकडून पीयुष चावलाने एकमेव विकेट घेतली.

तत्पूर्वी, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 179 धावा केल्या होत्या. मुंबईकडून तिलक वर्माने 45 चेंडूत 65 धावांची खेळी केली, तर नेहल वढेराने 24 चेंडूत 49 धावांची खेळी केली. राजस्थानकडून गोलंदाजीत संदीप शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. (Yashasvi Jaiswal meet Brian Lara)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com