KKR vs RR Yashsvi Jaiswal : युझीची फिरकी, जैसवालचा जलवा! मुंबईला खाली खेचत राजस्थान थेट तिसऱ्याच स्थानावर पोहचला

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Yashavi Jaiswal
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Yashavi Jaiswalesakal

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Yashavi Jaiswal : कोलकाता नाईट रायडर्सचे 150 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने हे आव्हान 13 षटकात एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. सलामीवीर यशस्वी जैसवाल फक्त 13 चेंडूत 50 धावा ठोकून शांत बसला नाही. त्याने कर्णधार संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची तडाखेबाज भागीदारी रचली. यशस्वी जैसवालने 47 चेंडूत नाबाद 98 धावा चोपल्या. त्याला संजू सॅमसनने नाबाद 48 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी सामना 9 विकेट्स आणि तब्बल 41 चेंडू राखून जिंकला.

राजस्थानने आजचा सामना 41 चेंडू राखून जिंकल्याने त्यांचे नेट रनरेट चांगलेच वाढले आहे. या विजयासह ते 12 सामन्यात 12 गुण घेत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. त्यांनी मुंबई इंडियन्सला चौथ्या आणि लखनौ सुपर जायंट्सला पाचव्या स्थानावर ढकलले. राजस्थानचे नेट रनरेट हे +0.633 इतके आहे. तर मुंबईचे नेट रनरेट हे -0.255 आहे.

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Yashavi Jaiswal
Yashasvi Jaiswal : 6, 6, 4, 4, 4 यशस्वी जैसवालनं तोडलं केएलचं रेकॉर्ड; 13 चेंडूत ठोकल्या 50 धावा

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत होम ग्राऊंडवर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला 149 धावात रोखले. राजस्थानचा फिरकीपटू युझवेंद्र चहलसमोर केकेआरच्या भल्या भल्या फलंदाजांनी हातच टेकले. युझवेंद्र चहलने नितीश राणा (22), व्यंकटेश अय्यर (57), शार्दुर ठाकूर (1) आणि रिंकू सिंह (16) यांची शिकार केली. याचबरोबर युझवेंद्र चहल हा आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील ठरला. केकेआरकडून संथ सुरूवात करणाऱ्या व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 57 धावा केल्या.

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Yashavi Jaiswal
KKR vs RR : युझीचा विकेट्सचा चौकार! फिरकीसमोर केकेआरने जोडले हात

राजस्थानने केकेआरच्या 150 धावांचा पाठलाग करताना आपल्या डावाची सुरूवातच षटकाराने केली. केकेआरचा कर्णधार नितीश राणाने पहिले षटक टाकण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र यशस्वी जैसवालने त्याचे स्वागत षटकाराने केले. पहिल्या दोन चेंडूवर यशस्वीने दोन षटकार ठोकले. त्यानंतर दोन चौकार मारत केकेआरच्या कर्णधाराला चांगलेच धुतले. यशस्वी इथेच थांबला नाही तर त्याने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत पहिल्याच षटकात 26 धावा चोपल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com