R Ashwin criticizes Rishabh Pant in IPL 2025 : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या शेवटचा साखळी सामना थरारक झाला. लखनौ सुपर जायंट्नसवर ६ विकेट्स राखून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळवून क्वालिफायर १ मध्ये जागा पक्की केली. पण, हा सामना चर्चेत राहिला तो दिग्वेश राठी ( Digvesh Rathi) ने केलेल्या मंकडींगमुळे... दिग्वेश राठीने त्याच्या गोलंदाजीवर नॉन स्ट्रायकर एंडवर असलेल्या जितेश शर्मला रन आऊट केले. त्याने अपीलही केले. तिसऱ्या अम्पयारने जितेशला नाबाद दिले आणि नंतर रिषभ पंतनेही अपील मागे घेतले. भारताचा माजी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केले आहे.